यवतमाळ दिनांक 13 नोव्हेंबर( प्रतिनिधी)
वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणाऱ्या यवतमाळ येथील शिकाऊ डॉक्टरच्या हत्येचं रहस्य ४८ तासांच्या आत उलगडलं आहे. धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणातून शाब्दिक वाद होऊन दोन युवकांसह एका अल्पवयीन मुलाने चाकूने वार करून या डॉक्टरची हत्या (Doctor Murder Case) केल्याचं निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेतलं असून दुचाकीसह चाकू जप्त केला आहे.
ऋषीकेश गुलाबराव सवळे (२३, रा. महावीर नगर, यवतमाळ), प्रवीण संजीव गुंडजवार (२४, रा. सावित्रीबाई फुले सोसायटी, यवतमाळ) आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यवतमाळ (yavatmal)येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस अंतिम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या डॉ. अशोक पाल याच्या हत्येने सर्वत्र खळबळ उडाली होती. या घटनेनंतर निवासी डॉक्टर संतापले आणि आज शनिवारपासून नागपुरात मेडिकल व मेयो येथील निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता.
नेमकं काय घडलं?
शिकाऊ डॉक्टरच्या खुनाची तक्रार वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली होती. काही विद्यार्थींनींना ३० ऑगस्ट २०२१ रोजी वसतीगृहासमोर दोन व्यक्ती लघुशंका करताना आढळल्या. यावेळी वादविवाद होऊन मारहाणही झाली होती. त्यानंतर आरोपींना पोलीस चौकीत आणले असता अटकेतील दोघांनी नावे सांगितली होती. तसंच याप्रकरणी मध्यस्थी करणारा विद्यार्थी विवेक ढोरे व मृतक अशोक पाल व इतर त्यावेळी उपस्थित होते. मात्र तेव्हा अटकेतील दोघांनी ‘यवतमाळ क्या है हम दिखा देते’अशी धमकी दिली होती.
न महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा वचपा म्हणून आकाश दिलीप गोफणे (२१), तुषार शंकर नागदेवते (२४) रा. वाघापूर व अन्य साथीदारांनी धारदार शस्त्राने भोकसून अशोकचा खून केल्याचा संशय असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. त्यावरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून संशयित दोघांना अटक करत त्यांचा पीसीआर मिळवला. दरम्यान पोलिसांचा तपास सुरूच होता.






