जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर

0
17

*वाशिम जिल्ह्याची सुधारित पैसेवारी सरासरी ५४ पैसे

*मालेगाव व रिसोड तालुक्याची पैसेवारी ४७ पैसे 

 

वाशिम दि.१ (दिपक भारुका) – जिल्ह्याच्या सन २०२१-२२ या वर्षातील खरीप हंगामातील सुधारित हंगामी पैसेवारीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्याची सुधारित सरासरी पैसेवारी ५४ पैसे इतकी आहे. जिल्ह्यात एकूण ७९३ महसुली गावे आहेत. त्यापैकी ५७१ गावांची खरीप हंगामातील सुधारित पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त तर २२२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे.

वाशिम तालुक्यात लागवडी योग्य असलेल्या गावांची संख्या १३१ असून या सर्व गावांची सुधारित पैसेवारी ५७ पैसे आहे. मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची सुधारित पैसेवारी ४७ पैसे, रिसोड तालुक्यातील १०० गावांची पैसेवारी ४७ पैसे, मंगरुळपीर तालुक्यातील १३७ गावांची पैसेवारी ५७ पैसे, कारंजा तालुक्यातील १६७ गावांची पैसेवारी ५९ पैसे आणि मानोरा तालुक्यातील १३६ गावांची पैसेवारी ५९ पैसे इतकी आढळून आली आहे.

मालेगाव आणि रिसोड तालुक्याची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here