चाकूचा धाक दाखवून बॅगेतील 20 लाखांची रोख रक्कम लांबवली, नागपुरात थरार

0
9

नागपूर : नागपुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकूचा दाखवत चार चोरट्यांनी 20 लाख रुपये पळविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही इतवारी परिसरातील चितेश्वर मंदिर परिसरात घडली आहे.

या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. पण चोरट्यांनी तब्बल 20 लाखांची रक्कम लांबविल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणी चारही बाजूने तपास करत आहेत. तसेच पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्याची शक्यता आहे.एका कुरियर कंपनीचा मॅनेजर पैसे घेऊन आपल्या मालकाच्या घरी जात होता. या मॅनेजरजवळ 20 लाखांची रोख रक्कम होती. पण मॅनेजर आपल्या मालकाच्या घरी पैसे घेऊन जात असताना चार भामट्यांनी त्याला अडवलं.

चोरट्यांनी मॅनेजरला चाकूचा दाख दाखवत बॅगेत काय आहे ते विचारलं? त्यानंतर बॅगेची चैन खोलत ती बॅग मॅनेजरच्या हातातून हिसकावली. त्यानंतर ते पळून गेले.मॅनेजरने तातडीने आपल्यासोबत घडलेल्या सर्व घटनेची माहिती मालकाला दिली. मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलीस घटानस्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी परिसरात सीसीटीव्ही फुटेज आहेत का याचाही तपास केला.

पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस लवकरच या घटनेचा उलगडा करुन आरोपींना बेड्या ठोकतील अशी आशा तक्रारदारांनी व्यक्त केलीय. दरम्यान, या घटनेची संपूर्ण शहरात चर्चा सुरु आहे. नागपुरात चोरांची हिंमत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, असं मत स्थानिकांकडून व्यक्त केलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here