नांद आणि वडगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू,नदीकाठच्या जनतेनी सावध राहण्याचे आवाहन !

0
8

वडगाव आणि नांद या दोन्ही धरणाचे दरवाजे आवश्यकतेनुसार उघडण्यात आल्याने वणा नदीच्या पात्रात या धरणाच्या पाण्याचा विसर्ग होत असल्याने वणा नदीच्या काठावर राहणाऱ्या जनतेनी सावध राहण्याची सूचना कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे यांनी केली आहे.

आज दि २१ ला सकाळी वाजता वडगाव धरणाचे ३ दरवाजे व नांद धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आल्याने या धरणातून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग थेट वणा नदीच्या पात्रात होणार आहे.त्यातच नागपूर , उमरेड या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने व या भागातून येणारे पाणी हे थेट या दोन्ही धरणक्षेत्रात जमा होत असल्याने व ही दोन्ही धरणे सद्य स्थितीतीत पूर्ण भरलेली असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग करणे हे गरजेचे असल्याने वणा नदीच्या काठावरील जनतेने स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती राजेश ढुमणे यांनी केली असून प्रशासन पूर्णतः काळजी घेत असून सध्या कोणताही धोका नाही हे त्यांनी स्पष्ट केले मात्र मुसळधार पाऊस झाल्यास आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे संभाव्य धोक्याच्या सूचना त्यांनी देऊन जनतेला सावध केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here