नागपूर दिनांक 28 नोव्हेंबर (ग्रामीण प्रतिनिधी)
काल सायंकाळी मौदा तालुक्यातील कन्हान नदीच्या वढना गावाजवळील पात्रात १० तरुण पोहायला गेले असता ३ तरुणांचा बुडून मृत्यू झाला त्यातील एकाचा मृतदेह रात्री मिळाला होता, आज सकाळी दोन युवकांचा मृतदेह काढण्यात आला
सवीस्तर वृत्त असे की स्वामी नारायण मंदिर ट्रस्टच्या वर्धमान नगर येथील शाळेतील शिक्षक व कर्मचारी मौदा तालुक्यातील वढना येथील स्वामींनारायन गोशाळेत पिकनिक बनविण्याकरिता आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास आले. गोशाळेला कन्हान नदीच्या पात्रात १० तरुण मुले पोहण्याकरिता नदीत ५ वाजेच्या सुमारास पोहोचले. सर्व तरुण नदीत पोहण्याकरिता उतरले. परंतु बुडालेले तीन तरुण खोल पाण्यात गेले व बुडाले.
प्रशांत राजाभाई पटेल वय २३ वर्ष नागपूर, मूळगाव तितलागड ओरिसा याचा मृतदेह काल मिळाला व अभिषेक जितेंद्रभाई चव्हाण वय २१ वर्ष नागपूर, मुळगाव गौजुल, गुजरात. हरिकृष्ण वालजीभाई लिंबाचिया वय २८ वर्ष नागपूर, मुळगाव अहमदाबाद गुजरात यांचे मृतदेह आज सकाळी काढण्यात आले






