नागपूरात २४ लाख वैक्सिनेशनचा टप्पा पार

0
11

नागपूर, ता. २१ (प्रतिनिधि) : कोव्हिडवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरणाला जानेवारी महिन्यात सुरुवात झाली. यानंतर आज गुरुवारी (ता. २१) देशातील या मोहिमेने १०० कोटींचा टप्पा पार केला. यानिमित्त आज (ता. २१) महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपूर शहरातील लसीकरण केंद्राला भेट देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले तसेच त्यांना व नागरिकांना एक मोठे उद्दिष्ट गाठण्यात सहभाग नोंदविल्याबद्दल शुभेच्छा देत अभिनंदन केले. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनीसुध्दा नागरिकांना लवकरात-लवकर लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.

बाबुळखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या लसीकरण केंद्राला महापौरांनी भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, शहरातील पात्र सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे, गर्दी होऊ नये, यासाठी नागपूर महानगरपालिकेने सुयोग्य नियोजन केले. १५० वर लसीकरण केंद्र सुरू केले.

तेथे आवश्यक त्या सर्व सोयी केले. विद्यार्थी, दिव्यांग, महिला, परदेशी जाणारे व्यक्ती, विविध घटकांतील व्यक्ती यांच्यासाठी वेळोवेळी विशेष शिबीर आयोजित केले. परिणाम नागपुरात कोरोना लसीकरण मोहिमेने दोन्ही डोज मिळून 24 लाखांचा टप्पा पार केला. पहिला डोज १५,७३,१८३ नागरिकांनी तसेच ८,३८,७५५ नागरिकांनी दूसरा डोज घेतला.

देशाने गाठलेल्या १०० कोटींच्या टप्प्यामध्ये नागपूरचे योगदान मोठे आहे. ज्यांचे अद्यापही लसीकरण झाले नाही, त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नागपूरात लसीकरणाची अद्यावत स्थिती (20 October, 2021)

पहिला डोज :-

आरोग्य सेवक – 48325

फ्रंट लाईन वर्कर – 56679

18 + वयोगट – 838587

45 + वयोगट – 290091

45 + कोमार्बिड – 101305

60 + सर्व नागरिक – 238196

पहिला डोज – एकूण : – 1573183

 

दूसरा डोज :-

आरोग्य सेवक – 29180

फ्रंट लाईन वर्कर – 38856

18 + वयोगट – 318199

45 + वयोगट – 240581

45 + कोमार्बिड – 39951

60 + सर्व नागरिक – 171988

दूसरा डोज – एकूण – 838755

संपूर्ण लसीकरण एकूण : – 24,11,938

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here