अजीत पवारांच्या बहिणींवर आयकर छाप्यावर शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया

0
7

त्याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या मते आज जे काही घडलं ते उत्तर प्रदेशच्या प्रश्नावर माझ्यासह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळेच’, अशा शब्दात शरद पवार यांनी भाजपला जोरदार टोला लगावलाय. (Sharad Pawar)

‘शेतकरी आपली भूमिका मांडण्यासाठी जात असताना सत्ताधारी पक्षातील घटकांची वाहनं त्यांच्या अंगावर जातात. त्यात काही शेतकरी चिरडून ठार होतात. हे यापूर्वी कधी घडलं नव्हतं. सहाजिकच या घटनेचा सर्वांनी निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारनंही मंत्रिमंडळ बैठकीत निषेध व्यक्त केलाय. मीही याबाबत तीव्र भूमिका व्यक्त केलीय. लखीमपूरच्या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधारी पक्षातील लोकांना आलाय. त्याची प्रतिक्रिया म्हणून आज हे सुरु असल्याची शक्यता आहे’, अशा शब्दात पवारांनी आयकर विभागाच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिलीय.

कर वसुली करण्यासाठी जर त्यांना काही शंका येत असेल तर त्या संबंधीची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना आहे. या अधिकाराचा वापर कुणासंदर्भात करायचा, त्या संस्था किंवा त्यांच्याशी संबंधित बाबींवर केला तर योग्य आहे. पण या व्यवहाराशी दूरपर्यंत संबंध नसलेल्या मुलींवरही छापे टाकणं हा अधिकाराचा अतिरेक आहे, अशी घणाघाती टीकाही पवारांनी केलीय.

अधिकाराचा गैरवापर किती दिवस सहन करायचा?

आता लोकांनीच विचार करायला हवा की या प्रकारे अधिकाराचा गैरवापर हा किती दिवस सहन करायचा? काही लोक वेडीवाकडी भाष्य करुन, आरोप करुन, काहीही बोलतात. ते बोलल्यानंतर केंद्रीय एजन्सी त्याबद्दल कारवाई करण्यासाठी पुढे येतात. हे सर्वात आक्षेपार्ह असल्याचं सांगत पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवरही निशाणा साधलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here