कोरोनामुळे शिक्षकाची भूमिका बदलून त्यांच्यावर अधिक जबाबदाऱ्या वाढल्या – सुनील केदार

0
9

हिंगणा ( प्रतिनिधी)

कोरोनामुळे शिक्षकांची भूमिका बदलून ती विस्तृत आणि अधिक जबाबदारी दायक झाली. प्रत्येक शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्याला शिक्षण देण्यासाठी स्वतः ऑनलाईन चे धडे गिरवून सज्ज होऊ लागले आणि आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण घेऊ लागले. आणि त्यात बऱ्याच प्रमाणात शिक्षक साध्यही झाले. शिक्षकांशीवाय प्रगतिशील समाजाची निर्मिती शक्य नाही आणि परिस्थिती कशीही असो कितीही संकटे असो आम्ही ज्ञानदानाचे कार्य थांबवणार नाही. या संकल्पनेतून शिक्षकांनी कोविंड च्या काळात कार्य केलं त्याची जितकी प्रशंसा केली तितकी कमीच अशा समाजनिर्मितीसाठी पुढे सरसावलेल्या शिक्षकांचे मी शिक्षक दिनी अभिनंदन करतो असे नामदार सुनील केदार यांनी संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेतर्फे आयोजित शिक्षकांकारिता आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमात बोलत होते. केदार पुढे म्हणाले की कोरोनामुळे चार ते सात वयोगटातील विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले कारण याच वयात बुद्ध्यांकाचा विकास होतो. तर अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून दिनेश बंग यांनी वैचारिक बांधिलकी जोपासली असेही केदार म्हणाले.

हिंगणा येथील श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्था व जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा हिंगणा एमआयडीसी येथील एम.आय.ए क्लबमध्ये उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी राज्याचे कॅबिनेट मंत्री सुनील केदार हे होते तर कार्यक्रमाच्या अध्‍यक्षस्थानी माजी मंत्री व संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र बंग हे होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार विजय घोडमारे पाटील जि.प.नागपूर चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, सेंट पॉल शाळेचे संचालक राजाभाऊ टाकसाळे , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधिर गुप्ता, जि. प. महिला बालकल्याण सभापती उज्वला बोंढारे, शंकरलाल बंग, सतीश बंग, जिनिंग प्रेसिंग चे अध्यक्ष प्रकाश नागपुरे, जि. प. माजी सदस्य अवंतिका लेकुरवाळे, सभापती सुषमा कावळे, उपसभापती संजय चिकटे, राकापा जिल्हा कार्याध्यक्ष राजू राऊत प.स. सदस्य आकाश रंगारी राकापा महिला जिल्हा उपाध्यक्ष रश्मीताई, नायब तहसीलदार ज्योती भोसले, खंडाविकास अधिकारी यावले साहेब, कोटगुले, पप्पू जयस्वाल, राकापा युवक जिल्हाध्यक्ष श्याम मंडपे, माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, माजी जि. प. सदस्य गोवर्धन प्रधान, सुरेंद्र मोरे, गुणवंता चामाटे, विनोद चतुर्वेदि, सुधीर बाहेती, संजय पालीवाल, ऍड.द्वारकाप्रसाद काकांनी, सुशील दीक्षित आदी मान्यवर व तालुक्यातील शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

दोन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अ गट स्व. गोपीकिशन बंग यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आला असून या गटात रंजना गजाम प्रथम, समशेर शेख द्वितीय, चंद्रभान शोभणे तृतीय प्रदीप चन्ने चतुर्थ व शिल्पा उकूड्डे यांनी पाचवे स्थान मिळवले तर ब गट स्वर्गीय देवकी बाई बंग यांच्या स्मृती प्रित्यर्थ वेध घेण्यात आला असून या गटात रोशन चौधरी प्रथम, स्वाती भोंबे द्वितीय, पी आळे तृतीय डी. मेश्राम चतुर्थ व जी. उरकांदे यांनी पाचवे स्थान मिळवले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे संयोजक जि.प. सदस्य दिनेश बंग यांनी केले. पाहुण्यांचा परिचय संचालिका अरुणा बंग यांनी दिला सूत्रसंचालन आनंद महल्ले यांनी तर आभार संचालक महेश बंग यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here