श्री संती गणेशोत्सव -२०२२ श्री बाँकेबिहारी मंदिर, वृंदावन ची प्रतिकृती यावर्षीचे आकर्षण

0
18

नागपूर दिनांक 29 ऑगस्ट ( महानगर प्रतिनिधी )

महाराष्ट्रातील गणेशोत्सव म्हणजे एक उत्साहाचा, अपुर्वाईचा उत्सव, त्यातही नागपुरातून तर या उत्सवाला आनंदाचे उधाण येते. या उत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळ मोठया हिरीरीने सहभागी झाले आहे. या गणेशोत्सवाची सुरूवात मंडळाच्या वडीलधा-या मंडळीनी १९५८ साली करून सामाजीक बांधीलकीचा पाया रोवला व त्यांचा उद्देश लक्षात घेऊन मंडळाच्या सर्व पुरुष व महिला कार्यकर्ते ही परंपरा मोठया उत्साहात पुढे नेत असून दिवसेंदिवस गणेशोत्सवाच्या व्यतिरीक्त विविध सामाजीक, सांस्कृतीक व लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा करीत असते.

गणेशोत्सवामध्ये प्रामुख्याने विविध विषय, संकल्पना, प्रस्तुतीकरण, व संस्कृतीचे जतन करून पौराणिक कथा, देशभक्तीपर देखावे व देशातील विशेषतः महाराष्ट्रातील जगविख्यात संत व देव-देवतांच्या मंदिरांची प्रतिकृती तयार करण्यात मंडळ अग्रणी असते.

गेल्या पंधरा वर्षांपासून नागपूरचेच नव्हे तर संपुर्ण विदर्भाचे भूषण वाटावे अशी मंडळाने आपली ख्याती निर्माण केलेली आहे मंडळाने यापूर्वी संत श्री गजानन महाराज मंदिर, शेगाव, जंग जाझादीकी (1857 च्या संग्रामावर आधारीत देखावा ) श्री साईबाबा मंदिर शिर्डी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर, तिरुपती बालाजी मंदिर, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर अक्कलकोट, आय ज्योतिर्लिंग मंदिर त्र्यंबकेश्वर, तुळजाभवानी मंदीर तुळजापुर, सप्तश्रृंगी देवी मंदीर नाशिक, श्री खंडोबा मंदिर जेजुरी, श्री श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर पीठापुरम, श्री योगेश्वरी देवी मंदिर, अंबेजोगाई, महाकालेश्वर मंदिर, उज्जैन, शारदादेवी मंदिर, मैहर, अष्टविनायक दर्शन इत्यादी सुप्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती तयार करून नागपूरात नव्हे तर संपूर्ण विदर्भात एक आपली विशेष व आगळीवेगळी ख्याती य ओळख निर्माण केलेली आहे. दरवर्षी जवळपास ३ लाखांच्या वर भावीक मंडळाच्या या उत्सवाला दहा दिवसात भेट देतात.

गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाला मुर्ती, सजावट, विषय, संकल्पना व एकूण सर्व व्यवस्था यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालय, नागपूर तर्फे ‘आदर्श गणेशोत्सव’ स्पर्धेचा नागपूर शहरातून प्रथम पुरस्कार प्राप्त होत असून विविध संस्थांद्वारे सुद्धा मंडळाचा गौरव करण्यात येतो.

श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळ दरवर्षी विविध संकल्पना व विविध सुप्रसिध्द मंदिरांच्या प्रतिकृती, तेथील पूर्व संस्कृती, परंपरा व धार्मीक वातावरण तयार करून लोकांसाठी एक वेगळेपण प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करीत असते. यावर्षी श्री बाँकेबिहारी मंदिर, वृंदावन, उत्तरप्रदेश-सा सुप्रसिध्द मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकार करण्यात येणार आहे.

श्री बाँकेबिहारी ची सकाळी व संध्याकाळी होणारी पारंपारिक आरती, रोज होणारा श्रृंगार आरती, प्रसाद / भोग इत्यादी द्वारे बाँकेबिहारीच्या साक्षात दर्शनाचा लाभ नागपूरकरांना नागपूरातच व्हावा हा उद्देश्य घेवून मंडळाने बाँकेबिहारीच्या मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचा मानस केलेला आहे. श्री बाँकेबिहारीच्या दर्शना सोबतच तेथील प्राचीन इतिहास, परंपरा, संस्कृती,|

 

पुजापाठ प्रसाद वितरण व आपण वृंदावनला येवून साक्षात श्री दर्शन देत आहोत आगे बेब नागपूरातच तयार करण्याचा मंडळाया प्रमाण आहे. बोजेबिहारी मंदिरात होणारी रोग आरती व श्रृंगार मे संपन्न णार असून त्यासाठी वृंदावन मे पुनाना फिर आले जाते. २० ते १० पर्यंत इस्कॉनतर्फे भजन किर्तन ॥ सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे त्याप्रमाणे मंदिरात श्रीच्या अकरा प्रमुख सीलांचे चित्ररूपदर्शन सुद्धा याठिकाणी होणार आहे. तसेच श्रीकृष्णाचा शयनकक्ष व फळणा सुद्धा ठिकाणी या दर्शनासाठी राहणार आहे. गणरायाची अकरा फुटाची सुंदर विलक्षण व सुबक मूर्ती तसे दूर्दावन येथील श्रीकृष्णाच्या गुर्वानी हुबेहुब मुर्ती आकर्षणाचे केंद्र राहणार आहे.

 

तसेच या उत्सवादरम्यान लहान मुलांच्या विविध स्पर्धा जसे चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच महिलांसाठी

 

स्पर्धा महिलांसाठी उखाणे स्पर्धा इत्यादी स्पर्धाचे आयोजन तसेच एक दिवस रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे तसेच मेटल डिटेक्टर, अग्नीसुरक्षा यंत्र त्याच प्रमाणे १५-२० सुरक्षाकर्मी तैनात हा जवळपास १५० ते २०० महिला व पुरूष कार्यकर्ते भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी सज्ज राहतीतः।

असा हा भव्य-दिव्य सोहळा यशस्वी करण्याकरीता मंडळाला विविध कंपन्यांचे प्रायोजक लागलेले आहे. यात आदित्यअनपा मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लिमिटेड, हायजेनिक रिसर्च इन्स्टिटयुट प्रा. लिमिटेड, तिरुपती बालाजी शिक्षण संख्या, एक्सि फिटनेस स्टुडियो, वेल्स, पलोकार ज्वेलर्स, दत्तकृपा महिला को-ऑप. सोसायटी, ए.बी.पी. माझा, पोमोबाईल्स गृहिणी प्रॉडक्टस इत्यादीचे प्रायोजकत्व लाभलेले आहे.

उपरोक्त उत्सवाकरीता मुर्तीकार राकेश पाठराबे सजावट श्रीकांत डेकोरेशन (संदिप मुंबर, श्रीकांत तल्हार) व कलकला पुणे, भोपाळ व मुंबई येथून आलेले ५० कलाकार विद्युत व्यवस्था बबलु इलेक्ट्रीकल्स ध्वनी व्यवस्था प्रशांत साऊंड सर्विस व व्हिडीओ व्यवस्था राजु उजवणे व संच यांची आहे. पत्रपरिषदेला संयोजक संजय चिंचोले यांनी संबोधित केले. या प्रसंगी राजेश श्रीमानकर, अनिल वलीकर, दिनेश बावरे,सुनिल साऊरकर, मंगेश बडचाळकर, रोहन बोरकर, मुकुंद सपकाळ, अनिल जोशी, प्रदीप वडचाळकर, राजू गुप्ता इ. उपस्थित होते.

या गणेशोत्सवाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे संजय चिंचोले, राजेश श्रीमानकर, मंगेश वडयाळकर, दिनेश चावरे, प्रदिप वडाळकर, रोहन बोरकर, अॅड. पवन डिमोले, रघु खोत, डॉ. सुरेश चांडक, अनिल वाघ, अनिल जोशी, मुकुंद सपकाळ, संजय सुभाटे, कृपालसिंग, राजु गुप्ता, भुषण टोपरे, समीर वडयाळकर, आशिष बुधोलिया, अविनाश वाघुळे, सागर बोरकर, बाला मुंजे,राजेश झाम, विट्टू दुबरीकर, रवि रेवतकर, युवराज पेटकर, शेखर रावदेव, गजानन शेंडे, हरिष ढरकर महादेव हेडाऊ, महेश कटारा, श्री दुबे, हेमंत जोशी, प्रसन्न पाठक, अभिलाष सपकाळ, आदित्य सपकाळ ऋत्विक वितोडे, संकेत वितोडे, नीरज विश्वकर्मा,सतीश पेंढारी, हर्षल चावरे, अभिनव साउरकर, अमेय सैपूरिया, मनिष जहागिरदार, अखिलेश जाधव, प्रशांत आगलावे, चकुल श्रीमानकर, अविनाश जोहरापूरकर, कुणाल बोरकर, अतुल खोत, राहुल साऊरकर, जितु उपाध्याय, राजुभाई व्होरा, संजय पटवा हरीश सपकाळ, दत्ता हिवसे, रूपेश गणात्रा, विजय पाठक, राजु पत्राळे, सर्वेश पेशकर, चेतन मस्के, राजा राऊत, चंद्रशेखर क्षीरसागर, मिलींद सपकाळ, राजू वितोडे, निलेश भुसारी, राजेश संगतानी, मौलिक सावडिया, गोविंद सरोदे, प्रमोद मांडे, सौ. लता खोत, सौ. कविता चावरे, सौ. पौर्णिमा जहागिरदार, सौ. सुरेखा चिंचोले, सौ. छाया लुले, सौ. शिला बोरकर, सौ. मनिषा खोत,सौ. कल्पना पोथी, निर्मला कुमेरिया, सौ. सोनाली कोठेकर, सी. कविता इंगळे, सौ. जोशी, सौ. साऊरकर, इत्यादी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here