नागपूर दिनांक 26 ऑगस्ट ( शहर प्रतिनिधी)
नागपूर महानगर पालिका आणि OCW धरमपेठ झोन अंतर्गत सेमिनरी हिल जलकुंभ येथे फ्लो-मीटर लावण्यासाठी १२ तास अवधी चा शटडाऊन येत्या दि २८ ऑगस्ट (रविवार ) सकाळी १० ते रात्री १० वाजे पर्यंत घेण्याचे ठरविले आहे. ह्या शटडाऊन दरम्यान धरमपेठ झोन मधील रायफल लाईन ह्या मुख्य जलवाहिनीवरून वेगवेगवेग्ळ्या भागाचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे .
*या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा बाधित राहणारे भाग पुढीलप्रमाणे:
धरमपेठ झोन : १६० गाळे परिसर , आमदार निवास परिसर , आमदार निवास नजीकच्या वसाहत, प्रियदर्शिनी कॉलोनी, गिरीपेठ, गोरेपेठ, धरमपेठ, धरमपेठ-९ गली, गाडगा वस्ती, गवळीपुरा, घटते ले आउट , वसंतराव नाईक स्लम, पत्रकार सहनिवास, महाराजबाग चा परिसर, म्हाडा कॉलोनी, अमरावती रोड, रेल्वे वसाहत, वनामती परिसर , काचीपुरा स्लम, काचीपुरा ले आउट आणि रामदासपेठ चा संपूर्ण परिसर* …
ह्या धरमपेठ झोन शटडाऊन कालावधी दरम्यान आणि नंतर देखील बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे






