नागपूर दिनांक 24 ऑगस्ट ( महानगर प्रतिनिधी)
भारतीय संस्कृती चे प्रतिक जगाचा पोशिंदा महाराष्ट्राचा मानबिंदू शेतकरी यांच्या समानार्थ, पारंपारिक संस्कृतीची जोपासना व्हावी, बाल गोपालाचा उत्साह व्दिगुणीत व्हावा या उद्देशाने नवीन सुभेदार परिसरात नागमंदिर येथे शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक दिपक कापसे यांच्यातर्फे स्व. शहिद विजय कापसे स्मृती प्रित्यर्थ तान्हा पोळयाचे आयोजन शनिवार दि. २७ ऑगस्ट २०२२ ला दुपारी ४ वाजता, नविन सुभेदार नागमंदिर येथे करण्यात आलेला आहे.
स्व. शहिद विजय कापसे हे पोलीस खात्यात कामगिरीवर कर्तव्य करत असतांना शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपराजधानीतील तान्हा पोळयाचे आयोजन करण्यात येते मागील २७ वर्षापासून या तान्हया पोळयाच्या उत्सवाला सुरूवात झाली व आज २८ व्या वर्षात पर्दापण करताना या लहानश्या रोपटयाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
या तान्हा पोळयात परिसरातील जवळपास २० हजार नागरीक ५ ते ६ हजार बालक सहभागी होतात. भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या तान्हा पोळयाच्या उत्सवामुळे न्यु सुभेदार या परिसरात एक उत्कृष्ठ सामाजिक व सांस्कृतीक व्यासपीठ लाभलेले आहे.
उपराजधानीतील सर्वात मोठया भव्य तान्हा पोळा माणू उत्सवाचे नावलौकीक आहे. या महोत्सवात प्रथम ३ नदी पुरस्कार ( प्रथम पुरस्कार रू. ११,१११/-, व्दितीय पुरस्कार रु. ५,५५५/- तृतीय पुरस्कार रु. ३,३३३/-) विजेत्यांना प्रत्येकी रोख रक्कम व मोमेंटो तसेच ३ नदी विजेत्यांना प्रोत्साहन पुरस्कार (रू. १,००१/-) देण्यात येईल तसेच प्रथम के वेशभुषा पुरस्कार (प्रथम पुरस्कार रू. ११,१११/-, व्दितीय पुरस्कार रु. ५,५५५/- तृतीय पुरस्कार रु. ३,३३३/-) प्रत्येकी रोख रक्कम व मोमेंटो तसेच ३ वेशभुषा विजेत्याना प्रोत्साहन पुरस्कार (रू. १,००१/-) देण्यात येईल व सहभागी प्रत्येक बालकांना भेटवस्तु व २०रू. रोख रक्कम भेट स्वरुपात देण्यात येईल
या उत्सवात बलुन शो, पेपर ब्लॉस्ट शो ऊंट, घोड़ा शो, कार्टन शो तसेच ढोल ताशा व ध्वज पथक नवीन सुभेदार आखाडा, शिवकालीन युध्दकला प्रात्याक्षिका आहे. उपराजधानीतील या भव्य तान्हा पोळा उत्सवात विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना संपर्क प्रमुख प्रामुख्याने उपस्थित राहतील.
या तान्हा पोळा उत्सवात नागरीक व बाल गोपालानी उत्साहाने मोठया सख्येने सहभागी होण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना शहर प्रमुख व माजी नगरसेवक दिपक कापसे यानी केले आहे.






