नागपूर दिनांक 24 अगस्त ( शहर प्रतिनिधी)
“पोळा” या सनानिमित्त शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट, 2022 ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त यांचे मंजुरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे.
त्यानुसार शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट, 2022 ला “पोळा” या सनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. या संदर्भातील आदेश उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन यांनी निर्गमीत केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर महानगरपालिके व्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.






