पर्युषण पर्व दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने बंद

0
11

नागपूर दिनांक 22 ऑगस्ट ( प्रतिनिधी )

पर्युषण पर्व दिनानिमित्त श्रावण वैद्य 12 व भाद्रपद शुध्द 4 या दिवशी राज्यातील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या शासनाने निर्णय घेतलेल्या आहे. तसेच उर्वरीत दिवशी (श्रावण वैद्य 13 ते भाद्रपद शुध्द 3 व 5) सर्व कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद करण्याबाबत आव्हान करावे असे कळविलेले आहे.

त्या अनुषंगाने बुधवार दिनांक 24/08/2022 (श्रावण वैद्य 12) रोजी व बुधवार दिनांक 31/08/2022 (भाद्रपद शुध्द 4) रोजी नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येत आहे. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेव्दारे कार्यवाही करण्यात येईल.

तसेच दिनांक 25/08/2022 (श्रावण वैद्य 13) ते दिनांक 30/08/2022 व 01/09/2022 (भाद्रपद शुध्द 3 व 5) या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील

या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर महानगरपालिके व्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here