कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ: मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

0
20

महाराष्ट्र दिनांक 22 ऑगस्ट ( प्रतिनिधी)

कोरोनामुळे (Corona) ज्या विद्यार्थ्यांच्या पालकंचे निधन झाले आहे अशा विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण (Education) पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ होणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

“कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे फार मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here