पचखेडी येथे डेंगूमुळे 11 वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू

0
8

कुही:- जिल्ह्यासह तालुक्यात डेंगूची रुग्ण संख्या वाढतीवरच असून खेडोपाडी लहानापासून मोठ्यांपर्यंत डेंगूची लागन झालेले दिसून येत आहे. मात्र याची स्थानिक ग्रामपंचायती व तालुका आरोग्य विभाग गंभीरतेणे दखल घेत नसल्याने डेंगूची लागण झालेल्या तालुक्यातील एका चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पचखेडी येथील जी.प.उच्च प्राथमिक शाळेत पाचवीत असलेल्या कु. आर्या विजय ठवकर (11) हिला गत आठवड्यात डेंगूची लागण झाल्यानंतर उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात भरती केले असता रविवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरापासून तालुक्यातील गावखेड्यात डेंगू रुग्ण निघत असल्याचे माहीत असूनही आरोग्य यंत्रनेने ठोस पावले न उचलल्याचे ही संख्या वाढतीवरच राहिली त्यात बहुतेक अपुऱ्या स्वच्छता व डासांच्या उत्पत्तीवर गावात नाल्यात फवारणी व फॉगिंग न करता ग्रामपंचायती सुद्धा बघायच्या भूमिकेत राहिल्या .

परिणामी दिवसागणिक डेंगू रुग्ण संख्या वाढतीवरच आहे तर शासकीय रुग्णालयांसह खाजगी दवाखान्यात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तेव्हा अजूनही चिर निद्रेत असलेल्या स्थानिक प्रशासनाने आतातरी जागे व्हावे अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here