राज्यपाल कोशियारी यांच्या वक्तव्यावरून वाद सुरू,गुजराती आणि राजस्थानी लोक….

0
17

महाराष्ट्र दिनांक 30 जुलै ( प्रतिनिधी)

मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील अंधेरी येथील चौकाच्या नामकरण प्रसंगी केलं.

राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणातील एक वाक्य वादात सापडलं आहे.

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेल्यास या शहराला आर्थिक राजधानी कोण म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य राज्यपालांनी केलं आहे. या वक्तव्यावरुन नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here