संजय राऊतांवर बोलायला वेळ नाही, आमच्या पक्षातील छोटे प्रवक्ते बोलतील: फडणवीस

0
12

महाराष्ट्र दिनांक 28 जुलाई ( प्रतिनिधी)

सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे गटातील १६ बंडखोर आमदार अपात्र ठरतील आणि राज्यात पुन्हा सत्तांतर होईल, असा दावा करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांची साधी दखल घेण्यासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नकार दिला आहे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांचा नामोल्लेखही टाळला.

संजय राऊत यांनी राज्यात पुन्हा सत्तांतर होण्याचे संकेत दिले होते. त्यावर बोलताना फडणवीसांनी म्हटले की, ते ज्याप्रकारची विधानं करत आहेत, त्यावरून ते किती भाबडे आहेत, हे दिसून येते. ते दिवसातून कितीवेळा बोलतात. त्यांच्यावर बोलणं म्हणजे तोंडाची वाफ गमावण्यासारखं आहे. त्यांच्यावर कृपया मला विचारू नका. त्यांच्यावर बोलण्यासाठी आमच्या पक्षाचे छोटे प्रवक्ते आहेत, त्यांना तुम्ही याविषयी विचारा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला झालेल्या विलंबावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही फटकारले. ज्या लोकांनी ३२ दिवस पाच लोकांचे सरकार चालवले त्यांना आम्हाला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार नाही. आमचं मंत्रिमंडळ लवकरच स्थापन होईल. त्यामुळे कुठलंही काम अडकून राहणार नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here