फ्लिपकार्टचे गोडाऊन फोडून पोलिसांच्या गाडीला उडवून पळालेल्या गोधराकांडातील आरोपीला गोधरा येथून अटक

0
15

नागपूर दिनांक 21 जुलै (शहर प्रतिनिधी)

23 जून 2022 च्या रात्री 1 वाजेदरम्यान पो.स्टे. उमरेड येथील डी. बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक बदुलाल पांडे, पो.ना.  प्रदिप चवरे, पो.ना.तिलक रामटेके है डायल ११२ वाहनावर पेट्रोलींग करीता असताना एमआयडीसी परीसरात एक कंटेनर संशयीत रित्या दिसला व त्या मधुन एक पांढऱ्या रंगाचे बोरे बाहेर फेकतांनी एक इसम दिसला, त्यावरून त्यांना संशय आल्याने पो उपनि पांडे व पथक त्यांना तपासण्याकरीता गेले असता, संशयीत ईसम हे ती बोरी त्याच ठिकाणी फेकुन पळुन कन्टेनरसह पळुन गेले.

पोउपनि पांडे यांनी सोबत असलेले कर्मचारी तिलक रामटेके यांना सदर बोरी ची शहानीशा करण्यास सांगून त्याच ठिकाणी थांबवुन कन्टेनरचा पाठलाग सुरु केला. अंदाजे १८ की.मी. पाठलाग केल्यानंतर कन्टेनर चालकाने ग्राम मांडवा परीसरातील घनदाट जंगलामध्ये कन्टेनर अचानक थांबवीला व वेगाने तो कन्टेनर रीव्हर्स घेवुन पोलीसांना जिवे मारण्याच्या उद्देशाने वाहनाला धडक देवुन वाहनास उडवून दिले.

पांडे व पोना चवरे यांनी वाहनाचा दरवाजा उघडुन उडी घेतली त्यामुळे ते थोडक्यात बचावले त्याचवेळी कन्टेनरमधील ईतर ४ ईसमाने अचानक खाली उतरून पोउपनि पांडे यांचे वर लोखंडी रॉडने जिवघेणा हल्ला केला. पोउपनि पांडे यांनी त्यांचा प्रतीकार करताना गंभीर जखमी झाले. आरोपी हे अंधाराचा फायदा घेवुन कन्टेनरसह पळुन गेले होते.

आरोपीतांनी फ्लिपकार्ड कंपनीचे गोडाऊन फोडुन त्यातील माल चोरून घेऊन जात होते. फीर्यादी नामे अंकीत भारत मुन, वय- २६ वर्ष, रा— अड्यळवाले ले-आउट उमरेड, प्रबंधक फ्लीपकार्ट गोडाउन उमरेड यांच्या गीरड रोड उमरेड येथील फ्लीपकार्ट च्या गोडाउनचे कोणीतरी अज्ञात चोराने शटर तोडुन आत मध्ये प्रवेश करून दुकानात ठेवलेले एकुण- ७१,००० रू. चा मुद्देमाल (पार्सल) चोरी केला होता.

या दोन्ही घटनेच्या अनुषंगाने पो.स्टे. उमरेड येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. कन्टेनर मधील लोकांनी फेकलेल्या पांढ-या – या रंगाच्या बोरीची पाहणी केली असता त्यामध्ये फ्लीपकार्टच्या दुकानातील साहीत्य आढळुन आले वरून वरील नमुद गुन्ह्यातील आरोपी हे एकच असल्याचे निष्पन झाले होते.

दोन्ही गुन्हे अतीशय गंभीर स्वरुपाचे असल्याने दोन्ही गुन्ह्याचा लवकरात लवकर उलगडा करण्यासाठी पो.स्टे. उमरेड येथे डी.बी. व ईतर तीन पथके तयार करण्यात आली. पथकांनी अतिशय गोपणीय रित्या मेहनतीने सदर कंटेनरला नंबर प्लेट नसतांनाही तांत्रीकरित्या सदर कंटेनर हा गुजरात राज्यातील असल्याचे निष्पन्न करून त्याचा नंबर सुध्दा निष्पन्न केला. व त्यावरून सदरचा कंटेनर हा गुजरात राज्यातील गोध्रा येथील असल्याचे निष्पन्न केले.

गुन्ह्यात वापरलेला कन्टेनर व आरोपींचा शोध घेणे करीता उमरेड येथील डी.बी. पथक हे गुजरात गोधरा येथे रवाना झाले. सदर कन्टेनरचा मालक उस्मानगनी मोहम्मद इब्राहीम कॉफीवाला (वय५५ वर्ष )गोधरा हा असून त्याचे सोबत सदर गुन्ह्यात इरफान उर्फ जाफरु फारुक बांडी (वय- ४० वर्ष) उमर उर्फ पपाई अब्दुलसनार जादी, पव्या नाईक व एक ईतर ईसम असल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरून ईरफान उर्फ जाफर फारुक बांडी यास त्याच्या राहते घरून त्याब्यात घेण्यात आले तसेच कन्टेनरचा मालक व गुन्ह्यातील मुख्य आरोपी उस्मानगनी मोहम्मद इब्राहीम कॉफीवाला यास मलाजखंड जिल्हा बालाघाट येथून ताब्यात घेण्यात आले.

अटके दरम्यान दोन्ही आरोपी यांनी आपल्या ईतर तीन साथीदारांच्या मदतीने वरील दोन्ही गुन्हे केल्याचे कबुल केले. आरोपीतांनी वरील दोन्ही घटना करून पळुन जाताना मलाजखंड ज्वेलर्स दुकान फोडून ७० किलो चांदी चोरी केली होती गुन्ह्यात वापरलेला कन्टनेर हा आरोपीतांनी बालाघाट मध्यप्रदेश येथे कापुन नष्ट केला आहे.

यातील अटक आरोपी यांच्यावर यापुर्वी खून, खुनाचा प्रयत्न चोरी, दंगा, घरफोडी, शासकीय कर्मचा-यावर हल्ले, जनावराची अवैध्य वाहतुक इत्यादी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहे.

आरोपी नामे उस्मानगनी मोहम्मद इब्राहीम कॉफीवाला हा गुजरात येथील सन २००२ मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांड ( साबरमती एक्सप्रेस जळीत कांड, गोध्रा रेल्वे अपराध क्रमांक-०९६२००२ ) मधील आरोपी असुन ०८ वर्ष मध्यवर्ती कारागृह साबरमती येथे होता. सदर आरोपी है राहत असलेल्या भागात आरोपी व त्यांचे ईतर साथीदार हे ताटपत्री गँग  या नावाने कुख्यात असुन मालवाहू वाहनातील ताटपत्री कापुन मुद्देमाल चोरून नेण्याचे गुन्हे करण्यात पटाईत आहेत. अटक आरोपीतांनी अश्याच पद्धतीचा एका गुन्हा आंध्र प्रदेश येथे केल्याचे सध्या कबुल केले आहे. ईतर तीन आरोपीतांच्या शोधा करीता गोध्रा येथे पोलीस पथक पाठविण्यात येत आहे. तपासा दरम्यान ईतरही गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

नमुद्र गुन्ह्याची कामगीरी  पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  प्रमोद घोंगे, सपोनि. शरद भस्मे, पो.उप.नि. दिनेश खोटेले, पो.उप.नि. प्रशांत खोब्रागडे, पो.ना. प्रदिप चवरे, राधेश्याम कांबळे, पंकज बट्टे, रविंद्र जाधव, नितेश राठोड, प्रकाश गाथे, प्रदिप ठाकरे, तिलकचंद रामटेके, उमेश बांते सर्व नेमणुक पो.स्टे. उमरेड यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here