नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे या तारखेला होणार उद्घाटन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा

0
7

महाराष्ट्र दिनांक 17 जुलै ( प्रतिनिधी )

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तीन वेळा लांबणीवर पडलेल्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची प्रतिक्षा आता संपलेली आहे. या महामार्गातून आपली समृद्धी कधी होणार याची वाट बघणारे नागरीकही हा मार्ग अखेर कधी सुरू होणार अशी विचारणा करू लागले आहेत.

सर्वांच्याच प्रतिक्षेला विराम देताना नागपूर- शिर्डी समृद्धी महामार्ग १५ ऑगस्टला सुरू होणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कुर्ल्यात मंगेश कुडाळकर यांनी आयोजित केलेल्या एका सत्कार समारंभात घोषणा केली आहे.

नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गावरील वाहतूक १५ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. राज्याच्या विकासासाठी हा गेम चेंजर ठरणार आहे.

हा महामार्ग राज्यातील १० जिल्ह्यांतून जातो, मात्र त्याचा फायदा २४ जिल्ह्यांना होणार आहे. त्यावेळी त्याच्या पूर्णत्वाची प्रस्तावित तारीख ऑक्टोबर २०२१ अशी निश्चित करण्यात आली होती. परंतु भूसंपादन, कोरोना लॉकडाऊन अशा अनेक अडचणींमुळे आतापर्यंत नागपूर-शिर्डी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

या महामार्गाचे बांधकाम एकूण १६ टप्प्यात सुरू असून, नागपूर-मुंबई महामार्गावर ७०१ किमी लांबीची एकूण १,६९९ छोटी-मोठी बांधकामे सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यापैकी सुमारे १,४०० बांधकामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित बांधकाम वर्षभरात पूर्ण होईल असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here