अभिनेत्रीला रोलसाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या यूपीतील निर्मात्यांना मनसेने चपलेने चोपले

0
12

मुंबई : चित्रपट, वेब सिरीज, मालिका यामध्ये महत्वाचा रोल(भूमिका) देण्याचे आमीष दाखवून शारीरिक संबंधाची मागणी केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये असे गैरप्रकार वाढत असून ते रोखण्यासाठी पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेने असा गैरप्रकार करणाऱ्या परप्रांतीय चित्रपट निर्मात्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे.

मनसे चित्रपट सनेचे उपाध्यक्ष पद्मराम राणे यांना एका अभिनेत्रीचा फोन आला होता. या अभिनेत्रीने त्यांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सविस्तर सांगितला होता. अभिनेत्रीने सांगितले की, तिला एका कास्टींग दिग्दर्शकाचा फोन आला होता. त्याने सांगितले की, ‘तुला एका हिंदी चित्रपटासाठी कास्ट करण्यात आलं आहे. त्या चित्रपटात तुला लीड रोल पाहिजे असेल तर चित्रपटाच्या प्रोड्यूसरला खुश करावे लागेल. प्रोड्यूसर उद्या युपीतून मुंबईला येणार असून त्यांना खुश करावे लागेल.’ असे त्या अभिनेत्रीने मनसे चित्रपट सनेचे उपाध्यक्ष पद्मराम राणे यांना सांगितले आहे.

अभिनेत्रीला चित्रपटा मध्ये रोल देण्याचे आमीश दाखवून तिच्याकडून शारीरिक संबंध निर्माण करण्याची जबरदस्ती करणाऱ्या डायरेक्टर आणि कास्टिंग डायरेक्टरला मनसे स्टाईलने चोप दिला. भूमिका मिळवण्यासाठी प्रोड्युसर(निर्माता)ला खुश करावं लागेल, ठाण्यातील हॉटेल ला येऊन लखनऊ वरून येणाऱ्यासह तिघांसोबत रात्र घालवावी लागेल, असा फोन करून त्यांनी गैरवर्तन केले असल्याचे पद्मनाभ राणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here