मौदा : तालुक्यातील तारसा ज्वाइंड येथील पानठेला चालवत असलेल्या रिना लेखराम गणवीर,वय ३२ वर्ष हिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिशकाउन पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरांना मौदा पोलीसांनी पकडले.
लेखराम गुलाबराव गणवीर यांचा तारसा ज्वाइंड वरील कन्हान तारसा रोडवर लता राईस मिलजवळ पानठेला आहे. दिवसभर पानठेला उघडून पानठेल्यावर येणा-या जाणा-या लोकांना चहापाणी देत असतात.
बुधवारला (ता.२१) रोजी लेखराम हे पानठेला उघडण्याकरीता गेले व पानठेला उघडून त्यानंतर रीना जेवणाचा डब्बा घेवून सकाळी १० वाजतच्या सुमारास पानठेल्यावर गेली. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास पानठेल्यावर दोन अनोळखी इसम आले व त्यांनी चहा व सिगरेट मागितली असता ना दोन चहा व दोन सिगरेट दिल्या. त्यानंतर काही वेळाने पाऊस सुरू झाल्याने ते दोघेही अनोळखी इसम जवळपास एक तास पानठेल्यावर थांबले. त्यादरम्यान रीना हि फोनवर बोलत होती व काही वेळाने पाऊस संपल्यानंतर अंदाजे दुपारी ४.३० वाजताचे सुमारास त्या दोघांपैकी एक अनोळखी इसम त्यांचेकडे असलेल्या डिस्क्व्हर गाडीवर बसला आणि दुस-याने रीना हि फोनवर बोलत असता तिच्या गळ्यात असलेली सोन्याचे मंगळसुत्र हिस्कावले तसेच ती चोर चोर असे ओरडली असता लेखराम त्या दोघेही अनोळखी इसमांचे मागे धावले.
गाडीजवळ जावून गाडीची चाबी हिसंकावून जवळच्या कच-यामध्ये फेकली व ते दोघेही अनोळखी इसम गाडी सोडून कन्हान मार्गे पळू लागले. लोकांचे मदतीने चोरांच्या मागे धावले. पळता पळता दोन तिन ठिकाणी जमीनीवर पडले व उठून परत पळायला लागले. चोरांनी त्याचेजवळील चाकूने मारणाच्या प्रयत्न केला. तेव्हा त्यांचेमध्ये झटापट झाली व त्यामध्ये दोघेही चोरटे इसम खाली पडले व त्यांना मार लागला. लोकांनी त्यांना पकडून त्यांचे नांव, गाव विचारले असता गळसोडी जबरीने हिंसकावून नेणारा व चाकूचा धाक दाखविणा-या इसमाने त्याचे नाव रवी अदालत राजभर, वय २७ वर्ष, रा. कन्हान खदान नं. ०३ तसेच मोटार सायकल सुरू करण्याच्या प्रयत्न करणा-या इसमाने आपले नाव गोविंद गोपूल प्रसाद, वय २८ वर्ष, रा. कन्हान खदान नं. ०३ (सतभरिया महुआ गोरखपूर जिल्हा खुशीनगर हाटा) असे आहे. त्यानंतर दोघेही चोरटयाना पानठेल्यावर लोकांचे मदतीने आणले.
लगेच मौदा पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी आपली टीम पाठउन चोरांना मौदा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले.
दोन्ही चोरांवर कलम ४३८/२०२१ कलम ३९२, ३४ भांदवी गुन्हा दाखल करण्यात आला.आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. सदर गुन्ह्यासंबंधि चार्ज फ्रेम केलेले असून सदर केस चे दोन ते तीन दिवशात खटला चालविण्यासाठी विनंती केली.
पुढील तपास मौदा वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनात १४ तासात गुन्ह्याचा तपास करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र समाविष्ट करण्यात आले. सदर तपासात पोलीस निरीक्षक विजय जाधव व पोलीस कर्मचारी आहेत.





