माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर इडीने फास आणखी घट्ट केला असून त्यांच्या काटोल आणि वडवीरा येथील घरी छापा टाकला आहे , दोन वेगवेगळ्या पथकांकडून एकाच वेळी हे छापे टाकण्यात आले असून घरांची झाडाझडती सुरू आहे
यापूर्वीही ईडीने त्यांच्या नागपूर आणि मुंबई या घरांवर आणि कार्यालयांवर छापा टाकला होता आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते
दोन दिवसापूर्वी त्यांची दोन संपत्तीही ईडीने जप्त केली होती त्याची किंमत पूर्वी चार कोटी आणि नंतर साडेतीनशे कोटी रुपये सांगण्यात आली आहे






