मवीआ सरकारने आ.आशीष जयस्वाल यांच्या निकटवर्तीयांना दिले शासकीय कंत्राट : प्रशांत पवार

0
11

नागपूर दिनांक 25 जून ( प्रतिनिधी) 

महाविकास आघाडी सरकारने रामटेक चे आमदार आशीष जयस्वाल यांच्या निकटवर्तीयांनी शासकीय कंत्राट दिले असल्याचा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला

रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांना महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र राज्य खनीकर्म महामंडळ यांचे अध्यक्षपदी नियुक्त केले आहे. महाराष्ट्र राज्य खनीकर्म महामंडळाला महाजेनको यानी कोल वॉशरीजच्या कामासाठी नोडल एजन्सी म्हणुन नियुक्त केले आहे.

महाजेनको २२ दशलक्ष कोळसा प्रती वर्ष कोल वॉशरीज कडून धूवून घेत आहे. सदर टेंडर हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळातील असून चंद्रशेखर बावणकुळे यांनी सदर टेंडर प्रक्रीया पूर्ण करण्याची परवानगी दिली होती.

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना सनदी अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून कोल वॉश करण्याची प्रक्रीया पूर्ण केली. याआधी जय जवान जय किसान संघटनेने कोल वॉशरीज मूळे महाजनकोचे कोटयावधी रुपयांचे नूकसान होत असल्याचे कागदपत्रांच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

त्याची तक्रार सी.बी.आय. ला व अॅन्टी करप्शन ब्यूरोला दिली आहे. त्यावर चौकशी सुध्दा सुरु झाली असून लवकरच या सर्व घोटाळयाचा प्रकार जनतेसमोर येणार आहे अशी माहिती जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यानी दिली

आजच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. शिवसेना व अपक्ष आमदार मोठया प्रमाणात घोडा बाजार करीत असून, अरबो रुपयांची खरेदी विक्री होणार आहे.

या अपक्ष व शिवसेना आमदारांच्या बंडखोरीला पैसा पुरविण्याचे काम विविध फलाटदार करीत असून, कोल वॉशरीजच्या माध्यमातून जमा झालेला पैसा आमदार विकत घेण्यासाठी वापरला जात आहे अशी माहीती असल्याची बाब प्रशांत पवार यांनी पुढे बोलताना सांगितले

आमदार आशीष जयस्वाल यांनी कोल वॉशरीजचे विविध कंत्राट भारतीय जनता पार्टीच्या निकटवर्तीयांना देण्याची भूमीका पार पाडली असल्यामुळे वाशरीजच्या माध्यमातून जो पैसा उभा करण्यात आला त्याचा उपयोग बदलविण्यासाठी होत आहे.

जय जवान जय किसान संघटना यावर मोठया प्रमाणात आक्षेप घेत असून यांची उच्च स्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी करीत आहे.

यावेळी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, सचिव अरुण वनकर, समन्वयक विजयकुमार शिंदे, माजी नगरसेवक राजेश माटे, रविंद्र इटकेलवार, मिलींद महादेवकर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here