नागरिकांच्या सुविधेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळेत बदल

0
15

नागपूर दिनांक 15 जून ( महानगर प्रतिनिधी) :

जेष्ठ नागरिक, महिला, व्यवसायिक व सामान्य नागरिकांच्या सुविधेला लक्षात घेऊन जिल्हाधिकारी नागपूर यांनी आपल्या भेटीच्या वेळेत बदल केला आहे. आठवड्यातील चार दिवस सकाळ व दुपार अशा दोन सत्रात दिवस निहाय नवीन वेळ नागरिकांसाठी जाहीर करण्यात आली आहे.

नव्या वेळापत्रकानुसार जिल्हाधिकारी आर. विमला या प्रत्येक सोमवारी व मंगळवारी सकाळी दहा ते साडेदहा ( 10 ते 10.30) वाजता पर्यंत भेटतील. बुधवारचा दिवस हा तालुका दौऱ्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर दर गुरुवार व शुक्रवारला दुपारच्या सत्रात साडेतीन ते साडेचार (3.30 ते 4.30) या कालावधीत भेटतील.

जिल्हाधिकारी आता पर्यंत दररोज दुपारी चार ते पाच या कालावधीत नागरिकांना त्यांच्या अडचणीचे निराकरण करण्याकरिता भेटत होत्या. परंतु, काही नागरिकांनी सद्यस्थितीत असलेल्या भेटीच्या वेळा बाबत गैरसोय होत असल्यामुळे सकाळच्या सत्रातही भेट मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी वेळेत हा बदल केला असल्याचे म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here