डेल्टा प्लसमुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध,दुकानांच्या वेळा बदलणार

0
8

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात थैमान घातले होते,तब्बल 2 महिने दुकाने आणि व्यवसाय बंद होते ,21 जूनपासून यात  अनेक महिन्यानंतर महाराष्ट्रातील दुकानदार आणि व्यावसायिक यांना दिलासा मिळाला होता व त्यांना दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत उघडण्याची मुभा मिळाली होती

महाराष्ट्रात आता डेल्टा प्लस या व्हायरस ने एन्ट्री करताच राज्य सरकारने दुकानांच्या वेळेत बदल केला आहे

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आता तिसऱ्या गटाचे नियम लागू होणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आता तिसऱ्या गटाचे नियम लागू होणार आहेत. राज्यात ५ लेव्हलमध्ये जिल्ह्यांना निर्बंध लागू केले होते. मात्र, आता सगळ्या जिल्ह्यांना तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध लागू राहणार आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

दुकाने आता सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंतच उघडे ठेवता येणार आहे तसेच शनिवार आणि रविवार बंद राहील,जिल्हाधिकारी जिल्ह्यांसाठी लवकरच आदेश काढतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here