महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन धडाक्यात झाले होते, हवामान खात्याने या वर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती मात्र मागील दोन-तीन दिवसापासून महाराष्ट्रात मान्सून हुलकावनी देत असून पावसासाठी आणखीन सात दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे
मान्सूनचे वारे कमकुवत असल्यामुळे पुढील सात दिवस मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत, महाराष्ट्रासह दक्षिणेतील बहुतांश राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे पुणे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
अरबी समुद्राकडून येणारे वारे कमकुवत असून त्यामुळे पुढील सात दिवस फारसा पाऊस होणार नाही. कोकण, गोव्यात बर्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.






