युती करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांशी लवकरच चर्चा करणार: नाना पटोले

0
7

प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाशी निवडणुकीत युती करण्याशी चर्चा करणार असल्याचे मोठे विधान काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 2024ची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशीही आघाडी करण्यासाठी चर्चा करणार असल्याचं पटोलेंनी जाहीर केलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे

नाना पटोले यांनी अकोल्यात मीडियाशी बोलताना पटोले हे मोठं विधान केलं. 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे, असं पटोले म्हणाले. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं.

आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. मात्र, अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पटोले यांच्या या विधानामुळे राज्यात नव्या समीकरणाची नांदी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here