प्रशांत किशोर आज सकाळी शरद पवारांना भेटणार,प्रशांत किशोर प बंगाल निवडणुकींच्या विजयाचे शिल्पकार

0
7

प बंगाल निवडणुकीच्या विजयाचे शिल्पकार प्रशांत किशोर आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांची भेट घेणार आहे.आज सकाळी 10.30 च्या सुमारास ही भेट शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे

ही भेट कोणत्या कारणासाठी होणार आहे हे समोर आले नसून कशासाठी भेट होत आहे यांची चर्चा सुरू झाली आहे,शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आगामी काळात महाविकासआघाडी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढवेल, असे म्हटले होते. त्यामुळे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

पश्चिम बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला दणदणीत विजय मिळवून देत प्रशांत किशोर निवणुकीच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here