महाराष्ट्रात अखेर 12 वीची परीक्षा रद्द

0
8

महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला असुन अखेर बारावीची परीक्षा रद्द (Maharashtra HSC exam Cancelled) करण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (Maharashtra Board) शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा (Maharashtra HSC exam cancelled) अधिकृतपणे रद्द झाल्या आहेत.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कालच बारावी परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवल्याचं सांगितलं होतं. शिवाय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा रद्द करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here