कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा येथे फळे व भाजीपाला ठोक मार्केट चे उद्घाटन

0
12

हिंगणा दिनांक 18 मई ( प्रतिनिधी)

हिंगणा वानाडोंगरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट परिसरात फळे व भाजीपाला ठोक मार्केट चे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेतील गटनेते दिनेश बंग यांच्या हस्ते करण्यात आले.

हिंगणा तालुक्यातील भाजीपाला व फळे उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल विकण्याकरिता नागपूर शहरातील कळमना मार्केट येथे जावे लागत होते तसेच तालुक्यातील छोट्या व्यावसायिकांना सुद्धा फळे व भाजीपाला आणण्याकरिता नागपूरला जावे लागत होते ही बाब हेरून कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट परिसरात भाजीपाला व फळे यांचे ठोक मार्केट सुरु करण्यात आले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव अव्हाळे, उपसभापती योगेश सातपुते,पंचायत समिती सदस्य, सुनील बोंदाडे, संचालक नरेश नरड, प्रेमलाल चौधरी, सुशीला श्रावण राऊत, विठ्ठल मिनियार सचिव किरण काकडे यांचेसह तालुक्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुक्यातील शेतकरी वर्गाने आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातच आणून विकावे असे आवाहन समितीचे सभापती बबनराव अव्हाळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here