महाराष्ट्र दिनांक 1 मई ( प्रतिनिधी)
मशिदीवरील भोंग्यांबद्दल बोलताना राज ठाकरे1 के म्हणाले, की आतापर्यंत सहन केलं. मात्र आता 3 तारखेनंतर सहन करणार नाही. ‘अभी नही तो कभी नही’ असं म्हणत राज ठारकरेंनी आवाहन केलं की, जर मशिदीवरील भोंगे काढले नाही, तर डबल आवाजात त्यासमोर आम्ही हनुमान चालिसा वाजवू. विनंती करुन समजत नसेल तर आमच्यासमोर पर्याय नाही असंही राज ठाकरे म्हणाले.
शरद पवारांनी जातीचं विष कालवलं…
बाबासाहेब पुरंदरेंना शरद पवारांनी उतरत्या वयात त्रास दिला. फक्त ते ब्राम्हण आहेत म्हणून त्यांना त्रास दिला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राज्यात जातीवाद सुरु झाला. जातीबद्दल आपुलकी प्रत्येकाला होती, मात्र दुसऱ्या जातीबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला.
शरद पवारांमुळे जाती-जातींमध्ये दुही निर्माण झाली
शरद पवार म्हणतात की माझ्यामुळे दुही निर्माण होतेय. मात्र, शरद पवारांनी जाती-जातींमध्ये केलेल्या भेदामुळे समाजात दुही निर्माण होतेय. प्रत्येक माणसाकडे जातीमधून पाहतात. हातात पुस्तक घेतलं की लेखकाची जात पाहतात. राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तक वाचली का म्हणे…माझ्या आजोबांनी लिहीलेल्या सर्व गोष्टी तुम्ही वाचा मग कळेल असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी काही संदर्भ देखील दिले आहेत. राष्ट्रवादीमुळे दुसऱ्या जातीबद्दल भेद निर्माण झाला असा घणाघात राज ठाकरेंनी केले.
नेत्यांमुळे महाराष्ट्राची अब्रू वेशीवर…
राज्यातील नेते सध्या एकमेकांवर आरोप करत आहेत. आई बहिणीवरुन शिव्या देत आहेत. आपण हे सगळं हसण्यावारी घेतोय. या नेत्यांमुळे महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली असं राज ठाकरे म्हणाले.
आपण महापुरुषांच्या फक्त जयंत्या, पुण्यतिथ्या करतोय…
राज ठाकरे यांनी आपल्या या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना म्हणाले की, शिवराय गेल्यानंतरही औरंगजेबाला भीती वाटत होती. कारण त्याच प्रेरणेवर मावळे लढत होते. आपण आज फक्त जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतोय. “बाबासाहेब म्हणतात ज्या दिवशी या देशातील लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचं भूत येईल त्यादिवशी अवघं जग जिंकू” असं राज ठाकरेंनी सांगितलं.
या पुढे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत सभा
राज्यात अनेक प्रश्न आहेत. संभाजीनगरमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. १० दिवसांतून पिण्याचे पाणी येते. परंतु आजचे जे काही प्रमुख विषय आहे, त्यावर मी बोलणार आहे. खरंतर संभाजीनगरचे मुळ नाव खडकी होते. खरंतर जो आपला इतिहास विसरतो, त्याचा भूगोल जातो.






