तर राज्यात पुन्हा कोरोना निर्बंध लागू होणार..! उपमुख्यमंत्री अजित पवार

0
12

महाराष्ट्र दिनांक 1 एप्रिल ( प्रतिनिधी)  

काही दिवसांपूर्वी देशातील कोरोना आटोक्यात आला होता. त्यामुळे सगळ्या कोविड निर्बंंधांतून नागरिकांची सुटका करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत असल्याचे चिंतेचे ढग साचू लागले आहेत..

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत काळजी व्यक्त केली जात असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे वक्तव्य केलं आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा निर्बंध लागणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर पवार यांनी मोठे विधान केलं.. तसेच सध्या राज्यात घडत असलेल्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केलं..

उपमुख्यमंत्री काय म्हणाले..?

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की “महाविकास आघाडी सरकारला सुरुवातीपासूनच कोरोनाचा सामना करावा लागला.. आपण सर्वांनी शर्थीने या संकटावर मात केली. कोरोनाचे संकट कमी झालं असलं, तरी ते संपलेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड निर्बंध हटवले असले, तरी आपण सर्वांनी स्वच्छेने मास्क वापरला पाहिजे..”

“कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. राज्यात पुन्हा मास्कसक्ती करायची की नाही, यावरही चर्चा झाली. लोकांना मास्क वापरण्याबाबत आवाहन करीत असून, सध्या तरी मास्कचा वापर ऐच्छिकच ठेवला आहे.”

कोरोना रुग्णसंख्या वाढली, तर राज्यात पुन्हा एकदा कोविड निर्बंध लागू शकतात.. अर्थात, याबाबत टास्क फोर्सशी चर्चा झाल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. टास्क फोर्सचा सल्ला घेतला जात असून, तज्ज्ञांशी चर्चा केली जात आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास टास्क फोर्सने सूचना केल्या, तर काही बंधनं पुन्हा लागू होऊ शकतात, असे पवार यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here