नागपूर सर्व दुकाने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी,पहा नवीन नियमावली

0
12

जिल्हाधिकारी व महानगर पालिका प्रशासनाने जारी केलेल्या १५ जून पर्यतच्या निर्बंधाच्या आदेशातील नवीन नियम 1 जून पासून लागू होतील त्यात दुकानदारांना मोठा दिलासा देण्यात आला आहे

1.सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते २ पर्यंत सातही दिवस सुरू असतील. ( यापूर्वी ७ ते ११ सुरु असणारी )

2. जीवनावश्यक गटात न येणारी (नॉन ऐसेन्सियल ,स्टॅड अलोन ) एकटी दुकाने ७ ते २ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील. मॉल बंद असेल.

3. कृषी संदर्भातील खते, बियाणे इत्यादी दुकाने सर्व सात दिवस सकाळी ७ ते २ सुरु असतील.

4. खाद्य पदार्थ, मद्य, ई – कॉमर्स व आवश्यक. सेवेतील सर्व बाबींची होम डिलिव्हरी रात्री 11 पर्यंत सुरू राहील.

5. माल वाहतूक सुरू असेल.

6. मार्निंग वॉक, आऊट डोअर, स्पोर्टस बंद असेल.

7. सर्व सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थितीत सुरू असेल.

8. सर्व खाजगी कार्यालये बंद असतील.

9. सबळ कारणाशिवाय दुपारी 3 नंतर रस्त्यावर फिरण्यास बंदी राहील..

#BreakTheChain #Restrictions

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here