तोक्ते नंतर महाराष्ट्राला बसणार यासचा फटका,9 जिह्यात मुसळधार पावसाचा इशारा

0
15

तोक्ते नंतर महाराष्ट्राला आणखी एका चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असून 9 जिल्हात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे ,यास वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे

कोणते आहे 9 जिल्हे

कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड,लातूर, अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता

 पूर्व विदर्भात येत्या 24 तासांत पावसाच्या हलक्या सरी आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो. यास चक्रिवादळ ओदिशातून, झारखंड, बिहार, छत्तीसगडच्या काही भागांत धडकण्याची शक्यता आहे. छत्तीसगडलगतच्या गोंदिया, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये यासचा सौम्य प्रभाव पडू शकतो. या भागात तासी 140 ते 150 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तविला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here