महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आता कोरोना टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक

0
11

राज्य सरकारने कोरोना संदर्भात अजून एक महत्वाचा निर्णय घेतलाय. रेल्वे प्रवासाद्वारे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्याची कोरोना RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक करण्यात आलंय.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या ब्रेक द चेनच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, वाहतुकीच्या कोणत्याही मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करणा-या कोणत्याही व्यक्तीला RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल घ्यावा लागेल, जो महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी 48 तास अगोदर केलेला असेल.

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेत चढताना, प्रवासात आणि आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यावर कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने दिलेल्या नवीन सूचना http://contents.irctc.co.in/en/stateWiseAdvisory.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here