महाराष्ट्रात वैद्यकीय परीक्षेच्या तारीखा जाहीर

0
7

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात हाहाकार माजला होता त्यामुळे लॉकडाउनसह कठोर निर्णय घेत विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

आता कोरोना संक्रमण कमी होत असल्याने राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 2 जूनपासून घेण्याचा विचार होता मात्र आता ह्या परीक्षा 10 ते 30 जून दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ.अजित पाठक यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

या वैद्यकीय परीक्षांमध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी. एच.एम.एस., बी.पी.टी.एच., बी.ओ. टी.एच. आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे. या वैद्यकीय पदवी परीक्षांसोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here