पोलिसांवर दबाव टाकल्याप्रकरणी फडणवीस-दरेकरांवर कारवाईचे संकेत

0
14

रेमडेसीवीर इंजेक्शनचा (remdesivir injection) साठा केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ब्रुफ्र फार्माच्या (Bruffer Pharma) संचालकाला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी हस्तक्षेप करणे योग्य नव्हते, असं म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी कारवाईचे संकेत दिले आहे. 

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना दिलीप वळसे पाटील यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.

मुंबई पोलिसांनी ब्रुफ्र फार्माच्या संचालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतले होते.  मुंबई पोलिसांना माहिती मिळाली होती की, 50 हजार रेमडेसीवीर येत आहे. त्याची चौकशी करण्यासाठी  डोकानिया यांना बोलवले होते, असा खुलासा वळसे पाटील यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here