मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

0
12

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करोना लशीचा दुसरा डोस घेतला आहे. मुंबईतील जे. जे रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्र्यांनी लसीकरण करुन घेतलं आहे

११ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करोनावरील लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर आज गुरुवारी त्यांनी दुसरा डोस घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं मुख्यमंत्र्यांचा लशीचा डोस घेतानाचा फोटो ट्वीट करत ही माहिती दिली आहे. आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना करोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, आदित्य ठाकरे यांचीही करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते होम क्वारंटाइन असून घरीच उपचार घेत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here