राज्यात कठोर निर्बंध आवश्यक :शरद पवार

0
13

महाराष्ट्रात् संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतोय,राज्य सरकारनं ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. मात्र, व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात निर्बंधांना विरोध होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेसबुक लाइव्हद्वारे राज्यातील जनतेसोबत संवाद साधला आहे.

जनतेच्या जीवाच्या दृष्टीनं राज्य सरकार कठोर निर्णय घेत आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे.

राज्यातील वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र झटत असून परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारला नाईलाजाने कठोर निर्बंध करावे लागत आहेत, याला दुसरा पर्याय नाही. केंद्र सरकारचंही हेच म्हणणं आहे. केंद्र सरकार राज्याला सहकार्य करण्यास तत्पर आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी मी संपर्क साधला. त्यावेळी संपूर्णपणे महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचं केंद्रानं सांगितलं आहे,’ असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here