नागपूर दिनांक 28 मार्च (प्रतिनिधी)
स्व. देवकीबाई बंग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे हेल्दी बेबी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भाग घेण्याकरिता जवळपास 92 बालकांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये विद्यार्थ्यांच्या बालकांच्या मानसिक व शारीरिक बाबी लक्षात घेऊन विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यात विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणीचे काम ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमुने केले, तर इतर बाबीचे परीक्षण संस्थेच्या संचालिका सौ. अरुणा बंग, संचालक महेश बंग, तसेच शाळेचे प्राचार्य नितीन तुपेकर यांनी केले व विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली.
दोन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अ गटात आरोही सिंदूरकर ही प्रथम, अनन्या नागोसे द्वितीय तर युविका कैकाडे व व शिवांशू गुप्ता यांना तृतीय पुरस्कार मिळाला. ब गटात प्रथा गुप्ता प्रथम लावण्या तीवस्कर द्वितीय तर पायल चानपुरकर तृतीय पुरस्कार मिळविण्यात यशस्वी झाले
स्पर्धेत सहभागी सर्व बालकांना विशेष प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता पर्यावेक्षक अतुल कटरे, श्वेता तुपेकर, मनीषा कटरे, नितीन लोहकरे, रेणू वारकरी, कल्पना अवारे, करिष्मा कुंभारे, रेखा पाटील आदींसह शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले






