नागपूर २६ मार्च ( महानगर प्रतिनीधी)
नागरिकांची सातत्याने होणारी मागणी तसेच शिक्षण किंवा इतर कामांकरिता घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. या वाढलेल्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत महा मेट्रो नागपूरने गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये देखील वाढ केली आहे.
दिनांक २६ मार्च (शनिवार) पासून ऑरेंज आणि ऍक्वा लाईन वर रात्री ९.३० वाजता शेवटची मेट्रो सेवा नागरिकांकरिता उपलब्ध असेल.
या पूर्वी या सेवा रात्री ९.०० वाजता पर्यंत उपलब्ध होत्या परंतु नागरिकांची मागणी लक्षात घेता या सेवामध्ये वाढ करण्यात आली आहे. या अंतर्गत प्रवासी सेवा सकाळी ६.३० ते रात्री ९.३० वाजे पर्यंत दोन्हीही – ऑरेंज आणि एक्वा मार्गिकांवर उपलब्ध होणार आहे.
नुकतेच महा मेट्रोने नागपूरकरांच्या मागणी प्रमाणे दिवसाची पहिली फेरी सकाळी ६.३० वाजता केली होती. त्यामुळे या दोन्हीही मार्गिकांवरील शाळा, महाविद्यालय तसेच इतर संस्थांमध्ये सकाळच्या पाळीत कार्यरत असलेल्या विद्यार्थी किंवा इतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळाल्याने आता शैक्षणिक आणि इतर व्यावसायिक संस्थांमधील कामकाज पूर्ववत होत आहे. या पार्श्वभूमीवर आता शिक्षण आणि इतर कामाकरिता घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील वाढते आहे. या मुळे मेट्रो मार्गिकेवर किवा निकटच्या परिसरात असलेल्या संस्थांमध्ये शिकणाऱ्या किवा कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांची, कर्मचार्यांची मेट्रो सेवेत मध्ये वाढ करण्याची मागणी होती.
शिवाय हॉटेल, दुकाने सारख्या व्यावसायिक प्रतिष्ठानात मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रात्री ९ वाजे नंतर मेट्रो फेरी सुरु करण्याची मागणी केली होती. हि मागणी लक्षात घेता महा मेट्रो तर्फे ९.३० वाजता शेवटची फेरी सुरु करण्यासंबंधीचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. वाढीव फेर्यांप्रमाणे नवीन वेळापत्रक २६ मार्च पासून म्हणजे शनिवार पासून लागू होणार आहे. या वाढीव फेऱ्यांचा नागपूरकरांना नक्कीच फायदा होणार आहे.






