क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या बलिदान दिवसा निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्या 23 मार्चला पथसंचलन 

0
8

नागपूर दिनांक 22 मार्च (महानगर प्रतिनिधी)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत थोर क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या बलिदान दिवसा निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगराच्या तरुण स्वयंसेवकांचे कौमुदी पथसंचलन बुधवार दिनांक २३ मार्च २०२२ ला होईल.

अमरावती रोड, महाराज बाग चौक येथील विदर्भ हॉकी मैदानावर संध्याकाळी ७.३० वाजता संपत होईल. ठीक ८ वाजता पथसंचलनाला प्रारंभ होईल.

पथ संचलनाचा मार्ग हॉकी ग्राउंड- महात्मा गांधी पुतळा व्हेरायटी चौक-बर्डी मार्केट-लोहापुल दुर्गा माता मंदिर-नेताजी सुभाष चंद्र बोस पुतळा- टेकडी रोड-फ्रीडम पार्क-नागपूर विद्यापीठ- हॉकी मैदान असा आहे.

थोर क्रांतिकारकांच्या बलिदान दिवशी होणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येत मार्गावर उपस्थित राहावे असे आवाहन नागपूर महानगर संघचालक राजेश लोया व सह संघचालक श्रीधर गाडगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here