नागपूर दिनांक 22 मार्च (महानगर प्रतिनिधी)
शिवसंपर्क अभियान अंतर्गत शिवसेना नेता संजय राऊत 3 दिवसाच्या विदर्भ दौऱ्याचा पहिल्या दिवशी आज नागपूरात पोहचले
पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे चूक होती असे मान्य केले,हा निर्णय घाईघाईत घेण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले
अनिल देशमुख यांच्यावर ईडी, सीबीआय,इन्कम टॅक्स यांच्या मिळून जवळपास शंभर धाडी पडल्या आणि या संस्थेचा दुरुपयोग केला गेल्याचा आरोप यावेळी राऊत यांनी केला
नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले






