नागपूर दिनांक 21 मार्च ( प्रतिनिधी)
नागपूर जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त झालेल्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक लाभाच्या तक्रारीचे निराकरण करण्याकरिता उद्या 22 मार्च रोजी मंगळवारी सकाळी 10.30 वाजता आबासाहेब खेडकर सभागृहामध्ये पेंशन अदालत आयोजित करण्यात आली आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
मंगळवारी सकाळी 9.30 वाजता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सेवाविषयक लाभाबाबत तक्रारी असल्यास त्याची प्रथम नोंद करावी. त्यानंतर सकाळी 10.30 वाजतानंतर या संदर्भात आलेल्या तक्रारीवरुन सुनावणी सुरु केली जाईल. त्यामुळे सकाळी 9.30 पूर्वी टोकन भेटण्यासाठी वेळेत पोहोचण्याची सूचना जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.






