फुटाळ्यात गाडी चालविण्यावरुन वाद, युवकांमध्ये प्रचंड हाणामारी

0
6

नागपूर दिनांक 14 मार्च (प्रतिनिधी)

गाडीचा कट लागल्याचा वादातून दोन गटात हाणामारी आणि तोडफोड झाल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहेत. हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

फुटाळा तलावावर फिरायला गेलेल्या काही युवकांमध्ये गाडी चालविण्यावरुन वाद झाला होता. या वादाचे हाणामारीत पर्यावसन झाले. याप्रकरणी जरीपटका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

काही युवक फुटाळा तलाव परिसरात फिरायला गेले होते. तिथे गाडी चालविण्यावरून त्यांचा वाद झाला. मात्र तो तिथेच निपटून दोन युवक बाईकने 10 नंबर पुलियाकडे निघाले. मात्र रस्त्यात त्यांच्या गाडीचे पेट्रोल संपल्याने ते गाडी ढकलत पुढे नेत होते.

तेवढ्यात बुलेटवरून दोन जण आले आणि तुम्ही फुटाळाला गेले होते का विचारलं ? त्यांनी हो म्हणताच मारपीट सुरू केली. म्हणून ते तिथून पळाले आणि जवळच असलेल्या मधुशाला वाईन शॉपमध्ये शिरले मात्र आरोपीने तिथे येऊन त्यांना बाहेर काढलं. यानंतर जोरदार मारहाण केली आणि तोडफोड सुद्धा केली. मात्र हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here