१० वी १२ वी परीक्षेसाठी जिल्हयात भरारी पथक गठीत

0
12

नागपूर दि. 2 मार्च (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ( इयत्ता १२ वी ) दिनांक ०४ मार्च २०२२ ते ३० मार्च २०२२ व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( इयत्ता १० वी ) दिनांक १५ मार्च २०२२ ते ०४ एप्रिल २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने भरारी पथक गठीत केले आहे.

परिक्षार्थींना तणावमुक्त वातावणात परीक्षा देण्याकरिता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततापूर्ण वातावरणात पार पाडणे आवश्यक आहे. तसेच वरील परिक्षेच्य वेळी परिक्षा केंद्रावर कोणतही गैरप्रकार व आवारात गर्दी टाळणे, महत्वाच्या विषयाच्या पेपरच्या दिवशी उपद्रवी केंद्रांना आकस्मिक भेटी देवून गैरप्रकारांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी खालील वर्ग-अ व वर्ग-ब च्या अधिका-यांशी दक्षता पथकात नियुक्ती करण्यात येत असून दक्षता पथकात स्त्री प्रतिनिधींचा समावेश करण्यात येत आहे.

शासनाने जारी केलेल्या आदेशात दक्षता पथकात खालील प्रमाणे आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे.

उपजिल्हाधिकारी, भुसंपादन,(पी.पी.१ ) हेमा बडे,नागपूर, उपजिल्हाधिकारी,भुसंपादन (सामान्य )  माधुरी तिखे,नागपूर,नायब तहसिलदार, संगायो जि.का. ए.एस.जाधव, नागपूर, नायब तहसिलदार (महसूल ),अरविंद जयस्वाल, नागपूर, नायब तहसिलदार, ( नझूल ) जिल्हा कार्यालय, नागपूर योगीता यादव.

वरीलप्रमाणे दक्षता पथकाने नागपूर जिल्हयातील परीक्षा केंद्रावर महत्वाच्या विषयाच्या पेपरच्या दिवशी उपद्रवी केंद्रांना आकस्मिक भेटी देवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करावी तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत दक्षता पथकाने इंधन खर्चाची देयके व अहवाल विहीत केलेल्या विवरण पत्रात सादर करावा, अशी मागणी अतिरिक्त जिल्हादडाधिकारी, विजया बनकर, नागपूर यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here