श्री क्षेत्र भंडारेश्वर मंदिर वैरागड येथे गुंजणार हर हर महादेवाचा गजर ; 14 ते 16 फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम ..

0
13

आरमोरी / वैरागड :- आरमोरी तालुक्यातील मौजा वैरागड येथे दिनांक 14 फेब्रुवारी 2026 पासून महाशिवरात्री निमित्त धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त भोलूभाऊ सोमनानी व मित्रपरिवार वैरागड यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या होत असलेल्या महाशिवरात्रीच्या मंगलमय सोहळ्यास भक्तगणांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब, मित्रपरिवारासहित उपस्थित राहण्याचे आवाहन भोलूभाऊ सोमनानी व मित्रपरिवार वैरागड यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे स्वरूप _
शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9:00 (नव) वाजता घटस्थापना व महाहवन..
स्थळ – भोलूभाऊ सोमनानी यांचे निवासस्थान वैरागड येथे. त्यानंतर दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8:00 (आठ)वाजता महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर महादुग्धाभिषेक व त्रिशूल पूजन श्री क्षेत्र भंडारेश्वर मंदिर वैरागड येथे होणार, सकाळी 10:00 (दहा) वाजता महारुद्राभिषेक श्री भोलूभाऊ सोमनानी यांच्या निवासस्थान या ठिकाणी, त्यानंतर सायंकाळी 4:30 (साडेचार) वाजता भव्य त्रिशूल मिरवणूक भोलूभाऊ सोमनानी यांच्या निवासस्थानापासून मुख्य मार्गाने श्री क्षेत्र भंडारेश्वर मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. आणि मिरवणुकीनंतर मंदिरामध्ये विधिवत त्रिशूल स्थापना करण्यात येईल.

त्यानंतर दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी (नऊ) 9:00 वाजता श्री जगन्नाथ बाबा जन्मोत्सवा निमित्त सायंकाळी 3:00 (तीन) वाजता व गोपालकाला दुपारी 4:00 (चार) वाजता आणि त्यानंतर महाप्रसाद (महाभोजन) सायंकाळी 5:00 (पाच) वाजेपासून भोलूभाऊ सोमनानी यांच्या घरासमोरील पटांगणाचे आवारात महाभोजन होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक उत्सवामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. भोलू भाऊ सोमनानी व मित्रपरिवार वैरागड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here