एटापल्ली :- एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा गावाजवळ एटापल्ली ते येलचील रोडवरील नाग मंदिर जवळ कार आणि मोटर- सायकलचा अपघात झाल्यामुळे मोटार सायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून सदर घटना घडल्यानंतर उघडकीस आली आहे. अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव बबलू गोटा राहणार तुमरगुंडा असे असून हा अपघात एवढा भयंकर होता की कारच्या धडकेत मोटार सायकल स्वार जागीच ठार झाला आहे. सदर गाडी चंद्रपूर जिल्ह्याच्या पासिंगची असून एम. एच. ३४- सी. जे. ७४०३ असं अपघात करणाऱ्या (कार) गाडीचा नंबर आहे. सदर झालेल्या अपघाताच्या ठिकाणी पोलीस आलेले नव्हते, त्यामुळे सदर अपघाताचा पुढील तपास पोलीस करतील.






