नागपूरातील वेळेची बंधन हटणार?; जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवला ‘हा’ प्रस्ताव

0
8

नागपूर दिनांक 10 फेब्रुवारी ( प्रतिनिधी)

नागपुर जिल्ह्याने आज लसीकरणाच्या मोहिमेत मोठे उद्दिष्ट गाठले आहे, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 70 टक्के झाली आहे

शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार लशींचा दुसरा डोस टक्केवारी ७० टक्के पूर्ण करणारा जिल्हा परिशिष्ट ‘अ’मध्ये येत असून निर्बंध शिथिल करण्यात येतात. नागपूर जिल्ह्यातील दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या आता ७० टक्के पूर्ण झाली असून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना पाठविला. हा प्रस्ताव मान्य झाल्यास जिल्ह्यातील वेळेची बंधने हटणार आहेत

जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी नागपूर जिल्ह्यातील स्विमिंग पूल आणि वॉटर पार्क बंदच ठेवण्यात आले आहेत.

करोना बाधितांची संख्या घटत असल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ७ टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव पाठविला असून येत्या सोमवारपासून नागपुरातील निर्बंध शिथिल होऊ शकतात, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

असा आहे प्रस्ताव

 

राष्ट्रीय उद्यान, बगीचे, स्विमिंग पूल : ५० टक्के क्षमतेने

ब्युटी पार्लर, सलून, जिम : ५० टक्के क्षमतेने

रेस्टॉरंट, हॉटेल्स : ५० टक्के क्षमतेने

सिनेमागृह, नाट्यगृह : ५० टक्के क्षमतेने

सामिजिक, धार्मिक कार्यक्रम : २५ टक्के क्षमतेने किंवा २०० व्यक्ती (जी संख्या कमी असेल)

लग्न : २५ टक्के क्षमतेने किंवा २०० व्यक्ती

अंत्यसंस्कार : नियमित

आठवडी बाजार : नियमित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here