गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान पर्यटकांसाठी बंद

0
12

नागपूर,दि.10 :(शहर प्रतिनिधी)

गोरेवाडा प्रकल्प, नागपूर अंतर्गत बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान,जंगल ड्राईव्ह, बायोपार्क व निसर्ग पायवाट 10 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येत आहे.

शासनाच्या 8 जानेवारी 2022 च्या आदेशान्वये कोरोना विषाणूमूळे उदभवणाऱ्या रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण ठेवण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना व दिशानिर्देश जारी करण्यात आल्या असून त्यानुसार उद्याने, प्राणी संग्रहालये, तिकीट आकारण्यात आलेली स्थळे आदी 10 जानेवारी पासून पुढील आदेशापर्यंत बंद राहील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here